जळगाव जिल्हा
ना. जितेंद्र आव्हाड यांचे महापौरांकडून स्वागत
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी जिल्ह्यात आले आहे. चोपडा येथे जाण्यापूर्वी जळगावात महापौर जयश्री महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे खासगी कार्यक्रमानिमित्त चोपडा येथे मंगळवारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ना.आव्हाड जळगाव विमानतळावर आले असता महापौर जयश्री महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, ऍड.रवींद्र भैय्या पाटील, माजी आ.मनीष जैन, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.