जळगाव लाईव्ह न्यूज : 11 सप्टेंबर 2023 : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. विरांगणा लक्ष्मीबाई झाशी जंक्शन रेल्वे स्टेशनवर ब्लॉक घेण्यात आला असून यामुळे भुसावळ मार्गे धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे ऐन गणेत्सवात प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
विरांगणा लक्ष्मीबाई झाशी जंक्शन रेल्वे स्टेशनवर 35 दिवसांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 04 (600 मीटर लांबी) चा धुण्यायोग्य ऍप्रनच्या दुरुस्तीच्या कामासाठी उत्तर मध्य रेल्वेच्या विभागाला, रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. या आहेत रद्द झालेल्या गाड्या..
- ट्रेन क्र. 01921 पुणे-विरांगणा लक्ष्मीबाई झाशी जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस प्रवास सुरु होणारी दिनांक 14.09.23, 21.09.23, 28.09.23 रोजी रद्द करण्यात आली आहे.
2 गाडी क्र. 01922 विरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन
-पुणे साप्ताहिक एक्सप्रेस प्रवास सुरु होणारी दिनांक 13.09.23, 20.09.23, 27.09.23 रोजी रद्द करण्यात आली आहे. - ट्रेन क्र. 12171 लोकमान्य टिळक टर्मिनस- हरिद्वार जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस दर सोमवार आणि गुरुवारी प्रवास सुरु होणारी दिनांक 11.09.23,14.09.23,18.09.23,21.09.23, 25.09.23, 28.09.23 रोजी रद्द करण्यात आली आहे.
- ट्रेन क्र. 12172 हरिद्वार जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन दर मंगळवार आणि शुक्रवारी प्रवास सुरु होणारी दिनांक 12.09.23,15.09.23, 19.09.23, 22.09.23, 26.09.23, 29.09.23 रोजी रद्द करण्यात आली आहे.
- ट्रेन क्र. 22456 कालका-साईनगर शिर्डी द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस दर गुरुवार आणि रविवारी प्रवास सुरु होणारी दिनांक 14.09.23,17.09.23, 21.09.23 ,24.09.23, 28.09.23 रोजी रद्द करण्यात आली आहे.
- ट्रेन क्र. 22455 साईनगर शिर्डी – कालका द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस दर मंगळवार, शनिवार प्रवास सुरु होणारी दिनांक 16.09.23,19.09.23, 23.09.23, 26.09.23, 30.09.23 रोजी रद्द करण्यात आली आहे.
- ट्रेन क्र.12406 हजरत निजामुद्दीन – भुसावळ जंक्शन गोंडवाना एक्सप्रेस दर शुक्रवार आणि रविवार प्रवास सुरु होणारी दिनांक 15.09.23,17.09.23, 22.09.23, 24.09.23, 29.09.23 रोजी रद्द करण्यात आली आहे.
- ट्रेन क्र. 12405 भुसावळ जं.-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस दर मंगळवार व रविवार प्रवास सुरु होणारी दिनांक 17.09.23,19.09.23, 24.09.23,26.09.23, 01.10.23 रोजी रद्द करण्यात आली आहे.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
ही पायाभूत सुविधा अपग्रेड कामे उज्ज्वल भविष्यकरिता आवश्यक आहेत.