जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । येथील जेसीआय जळगाव सेंट्रलतर्फे नागरिकांसाठी नवीन बसस्थानक येथे मोफत पाणी वाटप करण्यात आले.

उन्हाळ्यात सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. नवीन बसस्थानक येथे जेसीआय जळगाव सेंट्रलतर्फे मोफत पाणीवाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. थंडगार पाणी पिण्यासाठी मिळाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

यावेळी जेसीआय जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष सी.ए. वेणुगोपाल झंवर, सचिव तुषार बियानी, सदस्य ऋषभ शाह, अभिलाष राठी, हर्षल मंडोरा, पंकज भावसार, नीलेश मणीयार, प्रसाद झंवर, निखिल कटारिया, कल्याणी झंवर, दिव्या झंवर व इतर पदाधिकारी आदी उपस्थित होते.












