जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२३ । महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच जामनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात काम करीत असताना एकाने जबरदस्तीने महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
जामनेर तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. गुरूवार ७ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता महिला शेतात सरपन जमा करत असतांना गावात राहणारा विष्णू पुनमचंद राठोड याने महिलेचे तोंड दाबून नाल्यातच अत्याचार केला.
हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विष्णू पुनमचंद राठोड याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड हे करीत आहे.