⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | नोकरी संधी | जळगाव जिल्हा परिषदे अंतर्गत ४१६ जागांसाठी भरती (शुद्धिपत्रक)

जळगाव जिल्हा परिषदे अंतर्गत ४१६ जागांसाठी भरती (शुद्धिपत्रक)

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । जळगाव  जिल्हा परिषदे मार्फत विविध पदांच्या एकूण ४१६ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदांचा सविस्तर तपशील यामध्ये देण्यात आला आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.

या पदांसाठी होणार भरती :

१) औषध निर्माता – ०१
२) आरोग्य सेवक – १००
३) आरोग्य सेविका (महिला) – ३१५

पात्रता : 

१) औषध निर्माता – : १ औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार

२) आरोग्य सेवक : ०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.

३) आरोग्य सेविका (महिला) :- ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील..

वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ५००/- रुपये [मागासवर्गीय – २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) :. निवड झालेल्या उमेदवाराला सातव्या वेतन श्रेणीनुसार पगार मिळणार आहे.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

– उमेदवार दिनांक १ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरीता उमेदवाराला एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती.

– पण शासनाचे महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने परीक्षा OMR Vendor मार्फत ऑफलाइन पद्धतीन होणार आहे. या परीक्षा सर्व जिल्हा परिषदांमार्फत एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेतून परीक्षा देता येईल.

– अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. अर्ज ऑनलाईन माध्यमातून करायचा आहे. उमेदवारांनी दिनांक १ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

– पर्याय निवडताना काही अडचण आल्यास उमेदवारांना ७२९२००६३०५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार महत्वाचे बदल करण्याचे अधिकार शासनाकडे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.

शुद्धिपत्रक : पहा 

भरतीसंदर्भातील जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा 

 Apply Online अर्ज : येथे क्लिक करा 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.