जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । बहिणीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या तरुणाने परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. महेंद्र देवीदास पाटील (वय 22 रा. आनोरे ता. अमळनेर ) असे मयत तरुणाचे नाव असून महेंद्र याने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.
काय आहे घटना?
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील आनोरे गावातील रहिवासी महेंद्र पाटील हा जानेवारी महिन्यात जळगाव शहरातील आहुजा नगरात बहिण भारती व मेव्हणे हरेंद्र पाटील यांच्याकडे राहायला आला होता. महेंद्र याने जळगाव शहरातील एका खाजगी क्लासमध्ये स्पर्धा परीक्षेचा क्लास लावला होता. पीएसआय बनण्याचे त्याचे स्वप्न होते. काही दिवसांपूर्वी त्याने गृप डी अंतर्गत एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यात त्याला कमी मार्क पडले होते. तर दुसरीकडे नुकत्याच राज्यसेवेच्या शासनाने जागा जाही केल्या आहेत. त्या कमी असल्याने महेंद्र नैराश्यात होता.
याच नैराश्यातुन त्याने त्याची बहिण भारती यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी कुणीही नसताना महेंद्र याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरिक्षक नयन पाटील, सतीश हाळनोर, अनिल मोरे, संजय भालेराव यांनी घटनास्थळ गाठले. दरम्यान, महेंद्र याने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईट नोट पोलिसांनी ताब्यात घेतलीय. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत तालुका पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु आहे.
काय आहे सुसाईट नोटमध्ये लिहिलेलं?
आई वडील देवा सारखे आहे जीवन गोल आहे त्यांनी माझ्यासाठी खूप काही केल. माझं गोल वेगळा आहे पण माझ्या सोबत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एमपीएसीच्या परीक्षेत मला कमी मार्क पडले, त्यामूळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे असा मजकूर लिहून शेवटी महेंद्र याने आई वडिलांचे आभार मानले आहेत. अशी चिठ्ठी मृत्यूपूर्वी महेंद्र लिहली होती. ती पोलिसांनी ज्या गळफास घेतला तेथून जप्त केली आहे.