राज्यात मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरु ; जळगावात आज कशी असणार पावसाची स्थिती?

जून 17, 2025 8:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२५ । अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. जळगावसह राज्यात पाऊस कोसळत आहे. दरम्यान हवामान खात्याने आज दि १७ रोजी राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

mansoon rain jpg webp

जळगाव जिल्ह्यात मागच्या गेल्या काही दिवसापासून पावसाने उसंती घेतल्याने उकाड्यात वाढ झाली होती. यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावल्याने अतोनात नुकसान झाले. काल सोमवारी देखील जिल्ह्यात पाऊस झाला. आज १७ जून रोजी विविध ठिकाणी दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisements

१८ जून रोजी देखील जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मान्सूनची सक्रियता आहे मात्र अजूनही पूर्ण ताकदीने मान्सून पसरलेला नाही आहे. उन्ह-सावली आणि पाऊस असे संमिश्र वातावरण पुढील काही दिवस राहील. १९ व २० जून दरम्यान विविध ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. एक सलग किंवा दिवसभर पाऊस किंवा पावसाच्या झडीची शक्यता अजूनही निर्माण झालेले नाही, अशी माहिती येथील हवामान अभ्यासक यांनी दिली आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment