---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

Weather Update : सूर्य तापमान ! जळगावात 9 ते 17 फेब्रुवारीपर्यंत पारा वाढणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२५ । जळगावसह राज्यात थंडीचा जोर कमी झाल्याने दिवसाच्या वातावरणात उष्णतेचा प्रभाव जाणवत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्यावेळी वाऱ्यांचा वेग वाढल्याने जळगावकरांना गारवा जाणवला. परंतु आता उद्या म्हणजेच ९ ते १७ फेब्रुवारीपर्यंत जळगावचे तापमान वाढण्याची शक्यता आहे. Jalgaon Weather Update

tapman 2

याकाळात कमाल तापमान ३५ ते ३७ डिग्री सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान १५ ते १८ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहू शकते. वेस्टर्न डिस्ट्रबन्सचा प्रभाव तसेच वायव्य राजस्थान आणि परिसरात उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यापासून आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. उत्तर गुजरातमध्ये देखील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कोरडे आणि शुष्क वारे वाहतील असे हवामान अभ्यासकांनी सांगितले.

---Advertisement---

जळगावात सध्या तापमानाचा पारा वाढताना दिसून आला आहे. शुक्रवारचे जळगावचे कमाल तापमान ३४ अंश तर किमान तापमान १७ अंशापर्यंत पोहोचले आहे. सध्या रात्री आणि पहाटे गारवा जाणवत आहे. मात्र दुपारनंतर उन्हाचे चटके बसत असून उकाडा जाणवत आहे. उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याने उकाडा जाणवत असून तापमानात वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---