⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगावातील हवामानात पुन्हा बदल; IMD कडून हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा

जळगावातील हवामानात पुन्हा बदल; IMD कडून हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जानेवारी २०२५ । एकीकडे जळगावसह राज्यात गारठा वाढू लागला असताना यातच हवामानात पुन्हा एकदा बदल झालाय. हवामान खात्यानं जळगावसह (Jalgaon) काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे रब्बी पिकांचे (Rabbi) मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. Jalgaon Weather Update

काय आहे हवामान खात्याचा अंदाज?
हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. यात मराठवाडा आणि मध्य-उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना गारठ्यासह हलक्या पावसाच्या सरीही कोसळणार आहेत.

जळगावसह या जिल्यांना इशारा
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या ते मध्य स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. दोन दिवसानंतर राज्यात पुन्हा एकदा थंडी परतेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी जळगाव अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. यादरम्यान तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवत होता. मात्र गेल्या आठ्वड्यात किमान तापमानात घसरण झाल्याने थंडी पुन्हा परतली होती. मात्र आता पुन्हा एकदा हवामानात बदल झाला. सध्या जळगाव जिल्ह्यात रात्री आणि सकाळच्या वेळेत कडाक्याची थंडी जाणवत आहे. मात्र दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. शनिवारी १०.४ अंशावर असलेलं किमान तापमानात रविवारी वाढून ११.२ अंशावर पोहोचले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते. आता हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

थंडी पुन्हा वाढणार? :
दरम्यान उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी पुन्हा वेग धरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून नाहीशी झालेली थंडी पुन्हा परतण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारठा वाढणार आहे.

राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये किती तापमान?
पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमनान १ ते ३ अंशाच्या खाली जाऊ शकते. मध्य राज्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान १० अंशाच्या खाली जात असल्याची नोंद झाली आहे. यवतमाळचे तापमान ७.६ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. तर सोलापूर, सांगली, पुणे गोंदिया आणि नगर याठिकाणचे तापमान ८ अंशावर पोहचले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये १० ते १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.