⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | Jalgaon Weather : थंडीचा गारठा हरवला, जळगावकरांना फेब्रुवारीतच मिळेल का उन्हाळा अनुभवायला?

Jalgaon Weather : थंडीचा गारठा हरवला, जळगावकरांना फेब्रुवारीतच मिळेल का उन्हाळा अनुभवायला?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 4 फेब्रुवारी 2024 | सध्या राज्यासह जळगाव जिल्ह्यात तापमानात बदल पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसापूर्वी जळगावातील तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसखाली असल्याने थंडीचा कडाका जाणवला. मात्र आता तापमानात वाढ झाल्याने थंडीचा गारठा हरवला आहे.

हिवाळा ऋतु संपण्यास अद्याप अवकाश आहे. मात्र त्यापूर्वीच जिल्ह्यात थंडीचा जोर काही अंशी ओसरला असून फेब्रुवारीतच उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत असल्याचं चित्र आहे. ३ फेब्रुवारीला जिल्ह्यामधील दिवसाचा कमाल‎ तापमानाचा पारा ३१.४ अंश सेल्सिअसवर गेला. तर रात्रीचा पारा १३.४ अंश सेल्सिअसवर गेला. किमान तापमान वाढल्याने‎ रात्रीच्या थंडीची तीव्रता कमी झाली आहे.‎

फेब्रुवारीत महिन्याचे तापमान जानेवारी प्रमाणेच बऱ्यापैकी थंडी जाणवत असते. मात्र अलीकडे झालेल्या वातावरणातील बदलामुळे फेब्रुवारीतच उन्हाळा अनुभवायला मिळतो का, अशी शक्यता बळावली आहे. दरम्यान, उत्तरेकडील येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम राज्यावर दिसून आला. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील रात्रीचे तापमान ९ अंशावर तर दिवसाचे तापमान ३० अंशाखाली होते. यामुळे थंडीचा कडाका जाणवत होता.

मात्र आता मागील काही दिवसापासून तापमानात बदल झालेला दिसतोय. तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झालीय. पहाटे कडाक्याची थंडी जाणवत आहे. तर दुसरी उन्हाचे चटके बसत आहे. रात्रीचा थंडीचा कडाका देखील कमी झाला. यापूर्वी गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत तापमानाने नवा रेकॉर्ड केला होता. त्यावेळी १२२ वर्षानंतर फेब्रुवारी महिना हा सर्वाधिक उष्ण ठरला होता. त्यामुळे यंदा या महिन्यातील तापमान नेमकं कसे राहणार हे पाहणं गरजेचं ठरेल..

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.