जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२५ । जळगावसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत आहे. सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडत आहे. त्यात आता हवामानात आणखी मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जळगावात आज ३० जानेवारीपासून ते ५ फेब्रुवारी दरम्यान कमाल तापमान ३५ ते ३२ डिग्री सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान १५ ते १९ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील असा अंदाज वर्तविण्यात आहे. तसेच पुढील महिन्यात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या बाबतचा इशारा आयएमडीने जारी केला आहे. फेब्रुवारीची सुरुवालीला हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील किनाऱ्याजवळ उभ्या अक्षवृत्ताकार चक्रीय हवारचनेमुळे विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात आर्द्रतेची तीव्रता वाढल्याने दमट हवामानाचा अनुभव येत आहे. हे चक्रीय वारे बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीकडे स्थानांतरित होण्याची शक्यता असून, पूर्वेकडून येणाऱ्या आर्द्र हवेच्या प्रवाहामुळे जळगाव जिल्ह्यात गुरुवारपासून ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता आहे. १ फेब्रुवारी दरम्यान दुसरा पश्चिमी विक्षोभसक्रिय होणार असल्याने पाऊस ढगाळ वातावरण, धुक्याची शक्यता आहे.