---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

जळगावातील किमान तापमान पुन्हा घसरले; पण उन्हाचा चटका वाढणार? वाचा हवामान अंदाज?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२५ । महाराष्ट्रात किमान तापमानात (Temperature) घट होत असल्यामुळे पुन्हा गारठा वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) देखील तापमानात घट झाली असून मात्र अद्यापही हवी तशी थंडी (Cold) परतलेली नाही. मंगळवारी जळगावात किमान तापमान १२ अंशावर होते. दरम्यान, पुढील पाच दिवस तापमानात चढ उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे.

tapman 2

दिवसा ऊन आणि रात्री गारठा वाढल्यामुळे काही जणांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्याचा पारा हळू हळू घसरत आहे, त्यामुळे थंडी परत येत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात जळगाव किमान तापमान वाढून १८ अंशावर पोहोचले होते. मात्र काही दिवसापासून तापमानात घसरण होताना दिसत आहे. तापमानात घसरण होत असली तरी म्हणावी तशी थंडी जाणवत नाहीय.

---Advertisement---

मंगळवारी जळगावचे किमान तापमान १२ अंशावर होते. एकीकडे किमान तापमानाचा पारा घसरत असताना दुसरीकडे कमाल तापमानमध्ये वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी कमाल ३१.४ अशांवर गेले. दुपारच्या वेळेस जळगावकरांना उन्हाचा चटका काही प्रमाणात अनुभवायला मिळत आहे. तर सकाळी आणि सायंकाळनंतर हवेत गारठा जाणवत आहे.

आगामी पाच दिवस असं राहणार तापमान?
दिवसभर ऊन आणि रात्री गारव्यामुळे जळगावकरांचे आरोग्यही बिघडत आहे. दरम्यान जळगावात २७ जानेवारीपर्यंत तापमान सामान्य राहील. कमाल तापमान ३१ ते ३३ तर किमान तापमान १२ ते १४ अंशांवर राहू शकते. त्यामुळे थंडी कमी झालेली दिसून येईल. तर २७ तारेखनंतर थंडीचा जोर आणखी कमी होऊन काहीसा उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात दोन ते तीन अंशानी वाढ होईल. त्यामुळे दुपारी उकाडा जाणवण्यास सुरूवात होईल, अशी अंदाज हवामान अभ्यासक यांनी वर्तवला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---