⁠ 
बुधवार, मे 8, 2024

जळगावात उकाडा पुन्हा वाढला, दोन दिवसात पारा २ अंशाने वाढला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । मागील दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा २ ते ३ अंशाने घसरून ४१ ते ४२ अंशावर पोहोचला होता. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे. सोमवारी तापमानाचा पार ४४ अंशापर्यंत गेल्याने उन्हाचा उकाडा पुन्हा जाणवू लागला आहे. दरम्यान, दुसरीकडे मान्सून अंदमानात दाखल झाला असून तो येत्या 2 जूनपर्यंत तळकोकणात येईल असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्यापासून लवकरच दिलासा मिळणार आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी अंदमान-निकोबार बेट समूहावर नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) दाखल झाल्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरला होता. ४५ ते ४६ अंशावर जाणारा पारा आता ४१ ते ४२ अंशावर आला होता. त्यामुळे दिवसातील उष्णतेची लाट काहीशी कमी झाली होती. तसेच रात्रीच्या वेळेस वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वातावरणात थंडावा जाणवत आहे.

जिल्ह्यात मात्र, गेल्या दोन दिवसापासून पारा पुन्हा वाढू लागला आहे. रविवारी उन्हाचा पारा ४१.५ अंशांपर्यंत होता. तो त्यात सोमवारी वाढ होऊन तो पुन्हा ४३ अंशांवर गेला आहे. दाेन दिवसांत दाेन अंशांनी तापमान वाढले आहे. वाऱ्याचा वेगही ताशी २० किमीपर्यंत वाढलेला आहे. उष्णतेच्या झळांनी जळगावकरांना पुन्हा एकदा हैराण केले आहे. दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उष्णतेच्या झळा अधिक तीव्र असतात. त्यात काळजी घेतली नाही तर मात्र उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, यंदा मान्सून सहा दिवस आधीच अंदमानच्या सागरात दाखल झाला असून तो येत्या 2 जूनपर्यंत तळकोकणात येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सून २७ मे राेजी केरळात दाखल झाल्यानंतर हीच स्थिती अनुकूल राहिल्यास ६ जून राेजी मुंबईत तर पुढे ११ जून राेजी मान्सून खान्देशात धडकेल, असा अंदाज व्यक्त केला जाताे आहे. गेल्या वर्षी उत्तर महाराष्ट्रात १० जुलैपर्यंत मान्सूनची प्रतीक्षा करावी लागली हाेती. त्या तुलनेत यंदा महिनाभर आधीच आगमन हाेण्याचे संकेत आहेत.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
१२ वाजेला – ३८ अंश
१ वाजेला- ३९ अंशापुढे
२ वाजेला –४१ अंश
३ वाजेला – ४१ अंशापुढे
४ वाजेला – ४२ अंश
५ वाजेला – ४१ अंश
६ वाजेला – ४१अंश
७ वाजेला – ३९ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३७ तर रात्री ९ वाजेला ३६ अंशावर स्थिरावणार.