जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत असून कधी उन्हाचा तडाखा तर कधी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यात मागच्या तीन दिवसापासून तापमानाचा पाऱ्यात वाढ झालीय. जळगावचा तापमानाचा पारा ४२ अंशावर गेल्याने उष्णतेत वाढ झाल्याने जळगावकर हैराण झाला आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात १७ ते २० एप्रिल दरम्यान, हवामानात लक्षणीय बदल पाहायला मिळणार आहेत.

यादरम्यान, पारा ४३ अंशांपर्यंत पोहोचून उष्णतेची लाट जाणवेल तर दुसऱ्या बाजूला काही दिवसात ढगाळ वातावरण आणि सायंकाळी हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगावचे बुधवारी दुपारी तापमान ४२.५ अंशांवर होते. नंतर दुपारी ३.३० वाजता ढगाळ वातावरण झाले तर मंगळवारी ४२.५ अंश तापमान नोंदवण्यात आले.
बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पूर्व-आग्नेयकडील ओल्या वाऱ्यांमुळे जिल्ह्यात ५० टक्के ढगाळ वातावरण राहील. २० एप्रिलपर्यंत कोणत्याही दिवशी संध्याकाळी गडगडाटी हलक्या पावसाची ३० टक्के शक्यता आहे. कमाल तापमान ४१ अंश असून, आर्द्रता तुलनेने अधिक राहील. तसेच उत्तर-पश्चिमेकडून आणि नंतर गुजरातमार्गे येणाऱ्या वाऱ्यांमुळे एप्रिलपासून उष्णता वाढण्याची शक्यता आहे. १९ एप्रिल रोजी तापमान ४३ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेगही २५ किमी प्रतितास राहील
२० एप्रिलला केरळच्या दिशेने वाहणारे दक्षिण-पूर्व वारे आणि बंगालच्या उपसागरातील कमी कमी दाबाच्या प्रभावामुळे ढगाळ वातावरणात वाढ होईल. या दिवशी पावसाची शक्यता ४० टक्क्यांपर्यंत आहे. तापमान ४२ अंशांवर घसरण्याची शक्यता आहे.