---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

जळगावात गुलाबी थंडी पुन्हा परतणार! एकाच रात्री तापमानात मोठी घट; आजपासून असं राहणार तापमान?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२५ । दोन आठवड्यांपासून गायब झालेली थंडी पुन्हा परतली. आज जळगावसह राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. जळगावचे रात्रीचे तापमान १० अंशांपर्यंत आले आहे. आज (४ जानेवारी) पारा आणखी घसरला असून पुढील दोन दिवसांत पारा दोन ते तीन अंशांनी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. Jalgaon Weather Today

weather4 January

जळगावात गेल्या आठ्वड्यात अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे अवकाळीच्या ढगाळ वातावरणामुळे रात्रीचे तापमान ७ अंशावरून थेट १९ अंशापर्यंत वाढले होते. यामुळे जळगावकरांना काहीशा उकाडा जाणवत होता. मात्र या आठवड्यापासून तापमानात सातत्याने घसरण होत असल्याचं दिसून आले.

---Advertisement---

या आठवड्याच्या पहिल्या दिवशी रात्रीचे तापमान १७ अंशापर्यंत होते. मात्र त्यात गेल्या पाच दिवसात मोठी घट झाली. शुक्रवारी जळगावचे किमान तापमान १०.४ अंशांवर आले. कोरड्या हवामानामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या थंड वाऱ्यांमुळे थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे रात्रीच्या तापमानात एकाच रात्रीत ३ ते ४ अंशांची घट झाल्यामुळे रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका जाणवत असून सकाळी धुक्याची चादर दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे कमाल तापमान वाढून ३०.४ अंशावर गेलं आहे. यामुळे दुपारी उन्हाचा चटका बसत आहे.

आता पुढे काय?
आजपासून जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. आज ४ ते ९ जानेवारी दरम्यान थंडी वाढेल. यादरम्यान किमान तापमान ८ ते ११ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील तर कमाल तापमान २९ ते ३२ अंशांवर राहील. ६, ७ आणि ८ जानेवारी या तीन दिवसात किमान तापमान घसरेल असा अंदाज आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---