जळगावात ‘मे’ चा उकाडा ‘जुलै’त ; जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा, काय म्हणतो हवामानाचा अंदाज..?

जुलै 22, 2025 10:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे राज्यातील काही भागांत पावसाने जोर पकडला असून, श्रावणातील सरींची चाहूल लागली आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

tapman 1 jpg webp

जुलै महिन्याचे सरासरी तापमान ३२ अंश सेल्सिअस असताना, सोमवारी २१ जुलैला जळगाव शहराचा पारा थेट ३५ अंशांवर पोहोचला, ज्यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षात जुलै महिन्यात पारा ३५ अंशांवर जाण्याची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी २०१५ मध्ये तो ३७ अंशांवर पोहोचला होता. वाढत्या ८० तापमानासोबतच टक्क्यांपर्यंत वातावरणातील पोहोचलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता आणखी वाढली आहे, ज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Advertisements

‘मे’ चा उकाडा ‘जुलै’त

यंदा उन्हाळ्यातील उष्ण समजल्या जाणाऱ्या मे महिन्यात पाऊस झाल्यामुळे या काळात काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, मे महिन्यात न जाणवलेला उकाडा जुलै महिन्यात जाणवत असल्याचे चित्र सध्याच्या वातावरणावरून दिसून येत आहे.

Advertisements

काय म्हणतो हवामानाचा अंदाज ..?

जळगाव जिल्ह्यात आगामी काही दिवसांत दमदार पावसाची शक्यता कमीच असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. २५ ते २६ जुलैपर्यंत सायंकाळच्या वेळेस काही प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे तसेच, काही तालुक्यांमध्ये एखाद वेळेस एका दिवसात पावसाचे जोरदार टप्पे येऊ शकतात, असाही अंदाज आहे. मात्र, जुलैतील सरासरी गाठणारा पाऊस आता महिन्यात होण्याची शक्यता कमीच असल्याने, जिल्ह्याला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now