ढगाळ अन् दमट वातावरणाने जळगावकरांना फोडला घाम ; हवामान पुन्हा बदलणार? वाचा IMD चा अंदाज..

मे 15, 2025 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । गेल्या आठवड्यात वादळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने जळगावकरांना उष्णतेतून दिलासा मिळाला. आता मात्र जळगावचे तापमान चाळीशीच्या आत आले आहे; पण आर्द्रता वाढल्यामुळे दिवसभर उकाडा वाढला. यामुळे जळगावकर हैराण झाला आहे. बुधवारी तापमान ३९ अंशांवर होते. दरम्यान, उद्या शुक्रवारपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.

tapman 3

गेल्या एप्रिल महिन्यात जळगावचे तापमान ४२ ते ४४ अंशापर्यंत गेल्याने उष्णतेत मोठी वाढ झाली होती. मे हिट सारखा अनुभव एप्रिलमध्येच जळगावकरांना जाणवला. यामुळे मे महिन्यात उष्णतेची दाहकता वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु या महिन्यात हवामानात मोठा बदल झाला. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जळगावसह राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे.

Advertisements

जळगावात जिल्ह्यात ५ मेपासून अवकाळी पावसाने ‘एन्ट्री’ केल्यानंतर सलग आठ दिवस अवकाळीचा मुक्काम कायम राहिला. दि.१२ मे रोजी अवकाळी पाऊस माघारी परतला. ‘आयएमडी’ने पावसाची शक्यता वर्तविली असताना दि.१२ आणि १३ मे रोजीच्या रात्रीला जिल्ह्यात कुठेही अवकाळी पावसाने हजेरी लावली नाही.

Advertisements

मात्र यातच बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्र वारे विदर्भ आणि मराठवाड्याकडे येत आहे. ज्यामुळे जळगावात आर्द्रता वाढते आहे. आर्द्रता वाढल्यामुळे उकाड्यात वाढ झालीय. यामुळे जळगावकर घामाच्या धारांनी हैराण झाला आहे.  दरम्यान, आयएमडीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज दि.१५ पासून पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर दि.१६ पासून गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. एकीकडे पावसाची शक्यता असतानाच दि.१५ पासून तापमानाचा पारा ३९ वरुन ४० अंशावर जाणार आहे. त्यामुळे वातावरणातील आद्रता वाढणार असल्याने उकाडा आणखीच असह्य ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment