जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२४ । गेल्या आठवडयात फेंगल चक्रीवादाळामुळे ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडी गायब झाली होती. मात्र आता ढगाळ वातावरण निवळले असून तापमानात घसरण झाल्याने थंडी वाढली आहे.
जळगावात गुरूवारी १० अंशावर असलेले किमान तापमान शुक्रवारी ८.९ अंशावर घसरले आहे. यामुळे जळगावात गारठा वाढला आहे. दरम्यान, किमान तापमानात आज शनिवार आणि उद्या रविवार असे दोन दिवस आणखी घसरण होऊन दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.१६ तारखेपासून किमान तापमानात किरकोळ वाढ होईल असा अंदाज हवामान अभ्यासक यांनी वर्तविली आहे,