---Advertisement---
जळगाव जिल्हा

Jalgaon Weather : पाऊस गायब, तापमानात वाढ ; जिल्ह्यात ‘या’ तारखेनंतर जोरदार पावसाची शक्यता..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२३ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्यात धो धो बरसल्यानंतर ऑगस्ट महिन्यात मात्र चांगलीच दडी मारली. पावसाने विश्रांती घेताच उन्हाचा चटका वाढला आहे. ऐन श्रावणात उन्हाचा पारा ३४ वर गेला असून पुढील दोन-तीन दिवसांत ३६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

rain jpg webp webp

दरम्यान, राज्यासह जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाची पिके करपू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून पाऊस कधी पडणार याची प्रतीक्षा करीत आहे. दरम्यान, जळगावातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसासाठी अजून आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे. ४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अत्यंत हलक्या ते तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

---Advertisement---

जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मध्येच एखाद दिवशी शहरासह काही तालुक्यांमध्ये हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या पावसात सातत्य नसल्यामुळे श्रावणाचा अनुभव पाहायला मिळत नाही. श्रावण महिना म्हणजे हिरवळ,श्रावणसरींनी मन प्रसन्न करणारा, सुखद, आल्हाददायक महिना अशी ओळख आहे. मात्र यंदा ऐन श्रावणात उन्हाचा पारा ३४ वर गेला.

मुसळधार पावसाअभावी शेतातील पिकांची वाढ पाहिजे तशी झाली नाही. त्यात तापमानाचा पारा वाढल्यामुळे पिके करपण्याची शक्यता वाढत चालली आहे. सोमवारी तापमान ३४ अंशांवर पोहोचले. पुढील दोन-तीन दिवसांत ३६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. चार सप्टेंबरपर्यंत अत्यंत तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. यानंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ यांनी व्यक्त केला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---