---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

जळगावात ढगाळ वातावरणासह गारठा कायम; आगामी दिवस वातावरण कसे राहणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२५ । गेल्या काही दिवसापासून जळगावसह राज्यातील वातावरणात बदल दिसून आला. कधी ढगाळ वातावरण तर कधी थंडी गारठा. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे हे ढगाळ वातावरण काही दिवस राहणार आहे. दरम्यान जळगावात किमान तापमानात वाढ दिसून आला मात्र दुसरीकडे कमाल तापमानाचा पारा घसरला आहे.

tapman thandi jpg webp

सोमवारी जळगावचे किमान तापमान १४.१ अंशावर होते. तर कमाल तापमान २६ अंशाखाली होते. ढगाळ वातावरणासह थंड वाऱ्यांमुळे सोमवारी पहाटेपासून जळगाव जिल्ह्यात गारठा वाढला होता. दुपारी काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, सायंकाळी पुन्हा जैसे थे स्थिती होती. सोमवारी जिल्ह्यात ताशी १९ ते ३४ किलोमीटर प्रतितास एवढा हवेचा वेग होता. शेजारील मध्य प्रदेशात अचानक बदललेल्या वातावरणाचा हा परिणाम असून, गारठाही वाढला आहे.

---Advertisement---

आगामी दिवस राज्यात कसे राहणार हवामान?
दोन दिवस राज्यात धुके आणि ढगाळ हवामान कायम राहणार आहे, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. या काळात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भात आज अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात वातावरण सामान्य राहण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---