जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२५ । जळगावसह राज्यातील तापमानात चढ-उतार दिसून येत असून रात्रीच्या वेळेस आणि पहाटेच्या दरम्यान थंडी जाणवते, तर दिवसा उकाडा जाणवत आहे. जळगावात सोमवारी ११ अंशावर असलेलं किमान तापमान वाढून १५ अंशावर पोहोचले. यातच हवामान खात्यानं राज्यात आजपासून तीन दिवस हवामान कोरडे राहणार असून दुपारनंतर ठराविक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तविली आहे.

जळगावत आज कसं राहणार तापमान?
जळगावातील तापमानात सध्या वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळे थंडीचा प्रभाव कमी होत असल्याचं दिसत आहे. दरम्यान जळगावात आज कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. दुपारी नागरिकांना उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.आज सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे.
दरम्यान सध्याच्या बदलत्या हवामानामुळे नागरिकांची अडचणी वाढत असून, हवामानातील असंतुलन त्यांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकत आहे. ही परिस्थिती सध्या अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे.