जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२४ । सुमारे साडेतीन वर्षांनंतर जळगाव विमानतळ विमानसेवेच्या नकाशावर पुन्हा आले. सद्यःस्थितीत गोवा व हैदराबाद या दोन शहरांशी जळगाव जोडले गेले आहे. जळगाव येथून गोवा आणि हैदराबाद विमानसेवेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने फ्लाय 91 कंपनीकडून हालचाली सुरू होत्या. मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात जळगाव पुणे विमानसेवा सुरु होण्याची शक्यता होती. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
जळगाव पुणे सेवा जूनच्या १० ते १५ तारखेदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. ही सेवा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २५ तारखेला सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण प्रत्यक्षात त्याला अवकाश असल्याचे कंपनीचे सेल्स विभागाचे राष्ट्रीय प्रमुख नैमिश जोशी यांनी सांगितले.
विमान कंपनीला पुणे या सैन्य दलाच्या ताब्यात असलेल्या विमानतळाकडून परवानगी मिळालेली आहे; परंतु अद्याप कंपनीला वेळापत्रक (शेड्युल्ड) प्राप्त झालेले नाही. कंपनीकडून पुणे विमानतळावर लागणाऱ्या मनुष्यबळाची नेमणूक बाकी आहे