गुन्हेजळगाव शहर

जळगावात एकाच कुटुंबातील तिघांनी केलं विष प्राशन, एकाच मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२३ । जळगाव तालुक्यातील वडली येथे एक खळबळजनक घटना समोर आलीय. येथील एकाच कुटुंबातील तिघांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. तिघांनी विषारी औषध प्राशन करून घेतल्याचा प्रकार आज गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. यामधील वडिलांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला असून मुलगा व आईची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे.

नेमकी काय आहे घटना?

वडली गावातील रहिवाशी नारायण दंगल पाटील (वय-६६) हे आपल्या पत्नी भारती नारायण पाटील (वय-५५) आणि मुलगा गणेश नारायण पाटील (वय-३३) याच्यासोबत वस्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून पाटील कुटुंबिय तणावात असून या तणावात आज सकाळी या तिघांनी विषारी औषध सेवन केले.

त्यांनतर अत्यवस्थ वाटू लागल्याने गणेशने गावात राहणारा मित्र श्यामला फोन करून घरी येणाचे सांगितले. त्यानुसार श्याम हा घरी गेल्यावर आईवडीलांसह मुलगा गणेश हे तिघे गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत दिसून आले. श्यामने स्थान‍िक ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले.

यादरम्यान, नारायण पाटील यांचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहेत. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button