जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२५ । जळगावसह राज्यात आता तापमानात वाढ होताना दिसत असत आहे. रात्रीच्या देखील तापमानात वाढ होत असल्याने वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. सोमवारी जळगावचे कमाल तापमान ३६ तर किमान तापमान १६.२ अंशावर होते. आगामी काही दिवसात तापमान ४० अंशावर जाण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीपासूनच जळगावात उन्हाचा चटका वाढला आहे. सध्या तापमानात वाढ होत असताना दिसत असून यामुळे सकाळी साधारण 10 वाजल्यापासूनच उन्हाचा चटका बसत आहे. दुपारनंतर शहरातील रस्ते सुनसान दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उकाडा जाणवू लागल्याने जळगावकर हैराण झाले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत तापमानातील पारा आणखी वर जाण्याची शक्यता आहे.
राज्यात कसे राहणार हवामान ?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात फारसा बदल नाही .किमान तापमानात दोन ते तीन अंश घट होण्याची शक्यता आहे .हळूहळू कमाल तापमान ही 2 ते 3 अंशांनी येत्या चार दिवसात घसरणार आहे .