जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । दोन दिवसापूर्वी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात २ ते ३ अंशांची घसरला होता. मात्र काल शुक्रवारी दुसऱ्याच दिवशी वातावरण निरभ्र झाल्याने पारा पुन्हा वाढलेला दिसून आला. शुक्रवारी जळगाव जिल्हयातील तापमान ४२ अंशावर होता. त्यापूवी गुरुवारी गुरुवारी ४० अंशावर असल्याने उकाड्यापासून किंचित दिलासा मिळाला होता. आज शनिवारी सकाळी ११ वाजेपासूनच तापमानाचा पारा ३९ अंशावर होता. त्यामुळे साकळपासूनच उन्हाचा चटका बसतोय. आज तापमानाचा पारा ४३ अंशावर जाण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून राज्यभरात २१ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे २१ एप्रिल राेजी जिल्ह्यात सकाळपासून वातावरण ढगाळ हाेते. ६० टक्क्यांपेक्षा अधिक ढगाळ स्थिती असल्याने उन्हाची तीव्रता कमी असली तरी उष्णतेच्या झळा असह्य करणाऱ्या हाेत्या. दिवसभर उकाडा जाणवत हाेता. तापमान ४३ अंशांवरून ४० अंशापर्यंत खाली आलेले हाेते. यामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.
यंदा मार्च महिन्याच्या मध्यंतरीपासूनच जळगाव जिल्ह्याचा तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. जिल्ह्यात ६ एप्रिल रोजी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.८ तापमान नोंदवले गेले. नंतरदेखील पारा सलग ४१ ते ४२ अंशांपेक्षा जास्त राहिला.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
११ वाजेला – ३९ अंश
१२ वाजेला – ४० अंश
१ वाजेला- ४१ अंशापुढे
२ वाजेला – ४२ अंशापुढे
३ वाजेला – ४२ अंशापुढे
४ वाजेला – ४२ अंश
५ वाजेला – ४१ अंश
६ वाजेला – ३८ अंश
७ वाजेला – ३६ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३५ अंशावर स्थिरावणार.