जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । मान्सून अंदमानात लवकर दाखल झाल्याने दिलासा मिळाला असला तरी राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा चढलेलाच आहे. जळगाव तापमानाचा पारा स्थिर असून काल मंगळवारी जळगावातील कमाल तापमान ४३ अंश सेल्सियसपेक्षा अधिक नोंदले गेले. त्यामुळे जळगावकरांना उष्णता व उकाड्याला सामोरे जावे लागते.
मागील दिवसापूर्वी जळगावातील तापमानाचा पारा २ ते ३ अंशाने घसरून ४१ ते ४२ अंशावर पोहोचला होता. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र गेल्या दोन ते दिन दिवसात तापमानाचा पारा वाढू ४४ अंशापर्यंत गेल्याने उन्हाचा उकाडा पुन्हा जाणवू लागला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सार्वधिक तापमान असलेल्या भुसावळ शहरातील दिवसाचे कमाल तापमान ४३.९, तर रात्रीचे किमान तापमान ३५.४ अंश आहे
भुसावळ शहराचे यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमान ९ व १० मे रोजी ४७.२ अंशांवर पोहोचले होते. यानंतर चढ-उतार सुरु झाले. मंगळवारी कमाल तापमान ४३.९ अंश होते. सध्या वाढत्या उष्णतेच्या झळांनी जळगावकरांना पुन्हा एकदा हैराण केले आहे. दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उष्णतेच्या झळा अधिक तीव्र असतात. त्यात काळजी घेतली नाही तर मात्र उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, यंदा मान्सून सहा दिवस आधीच अंदमानच्या सागरात दाखल झाला असून तो येत्या 2 जूनपर्यंत तळकोकणात येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सून २७ मे राेजी केरळात दाखल झाल्यानंतर हीच स्थिती अनुकूल राहिल्यास ६ जून राेजी मुंबईत तर पुढे ११ जून राेजी मान्सून खान्देशात धडकेल, असा अंदाज व्यक्त केला जाताे आहे. गेल्या वर्षी उत्तर महाराष्ट्रात १० जुलैपर्यंत मान्सूनची प्रतीक्षा करावी लागली हाेती. त्या तुलनेत यंदा महिनाभर आधीच आगमन हाेण्याचे संकेत आहेत.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
१२ वाजेला – ३९ अंश
१ वाजेला- ४१ अंशापुढे
२ वाजेला –४१ अंश
३ वाजेला – ४१ अंशापुढे
४ वाजेला – ४२ अंश
५ वाजेला – ४१ अंश
६ वाजेला – २९अंश
७ वाजेला – ३७ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३६ तर रात्री ९ वाजेला ३४ अंशावर स्थिरावणार.