---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

IMD कडून राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, आज जळगावात कशी राहणार स्थिती?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२४ । राज्यातील अनेक भागात गारपीटसह अवकाळी पावसाने झोडपून काढले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यावरील अवकाळीच संकट येत्या 15 एप्रिलपर्यंत कायम राहणार असून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज राज्यातील अनेक भागांत रेड अन् ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान,

rain update jpg webp

दरम्यान, हवामान विभागानं पुढील ४८ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये विदर्भातील वर्धा आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय.

---Advertisement---

येत्या ४८ तासांत कुठे-कुठे कोसळणार पाऊस?
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा , चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.

उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची स्थिती असून, गुरुवारी रात्री जळगाव शहरासह काही तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी देखील संध्याकाळी जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. दुसरीकडे या पावसामुळे तापमानात घट झाली असून, सध्या जिल्ह्यातील तापमानात सरासरी ५ अंशाची घट झालीय. यामुळे भरउन्हाळ्यात पावसामुळे काही अंशी निर्माण झालेल्या गारव्यामुळे जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.

जळगावात आगामी पाच दिवस असं राहणार हवामान?
दरम्यान, आज १३ एप्रिल जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर १४ एप्रिल रोजी काही अंशी ढगाळ वातावरण, दुपारनंतर पावसाची स्थिती, १५ एप्रिल ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज, १६ एप्रिल रोजी काही अंशी कोरडे वातावरण, सायंकाळनंतर पावसाची शक्यता, १७ एप्रिल काही अंशी कोरडे वातावरण, सायंकाळनंतर पावसाची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---