जळगावरांनो एसी, कुलर लावून ठेवा ; तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे जाणार
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२४ । जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढू लागला असून गेल्या गेल्या आठवड्यात ३० अंशावर असलेला पारा आता ३६ अंशावर गेला आहे. यामुळे दुपारनंतर उन्हाचे चटके बसत उकाडा जाणवत आहे. दरम्यान, १५ ते २२ मार्चपर्यंत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.
जळगावात सध्या थंड व उष्ण असे संमिश्र वातावरण आहे. गेल्या आठ्वड्यात जळगावातील दिवसाचा कमाल पारा ३०.३ अंशावर होता. तर रात्रीचा किमान पारा १२ अंशावर आला होता. यामुळे रात्री आणि पहाटे काही प्रमाणात थंडी जाणवत होती. मात्र आता कमाल आणि किमान तापमानाचा पारा वाढला आहे. रविवारी जळगावचे कमाल तापमान ३६ अंशापर्यंत होते. तर किमान तापमान १४ अंशावर होते. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात १५ ते २२ मार्चपर्यंत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. दिवसा उकाडा वाढू लागल्याने अनेकांनी कुलरसह एसीचा आधार घेण्यास सुरुवात केलाय.
जिल्ह्यासाठी २०२४चा उन्हाळा अल निनो नसला तरीही, त्याचे अवशेष हवामानावर प्रभाव टाकू शकतात. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात येणाऱ्या उष्णतेच्या लाटा तीव्र होतील. मार्च महिन्यात तापमान वाढण्याची काही प्रमुख कारणे असून, यात पश्चिमी विक्षीभांची कमतरता अर्थात मार्च महिन्यात भारतावर पश्चिमी विक्षोभ देण्याची संख्या कमी होते
पश्चिमी विक्षोभ है उत्तर भारतात थंड हवा आणतात आणि तापमान कमी ठेवण्यास मदत करतात हे प्रमुख कारणआहे. यासोबतच सूर्यप्रकाशाची तीव्रता, अल निनो ज्यामुळे भारतात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि वारंवार होऊ शकतात व हवामान बदलाने बाढणारे तापमान हे कारणीभूत आहे, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.