जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२५ । जळगावसह (Jalgaon) राज्यात थंडी कमी झाली असून आता तापमानात वाढ होऊ लागली आहे. राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली असून येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जळगावात तापमानाचा पारा ३५ अंशापर्यंत पोहोचले आहे. Jalgaon Temperature Update

जळगावमधील तापमानात चढ उतार सुरु आहे. काही दिवसापूर्वी गार वाऱ्यामुळे किमान तापमानाचा पारा १५ अंशाखाली गेला होता. मात्र गेल्या आठवड्यात तापमानात वाढ होताना दिसून आले. फेब्रुवारी हा जळगावकरांसाठी हिवाळ्यातील शेवटचा आल्हाददायक महिना असतो. कारण मार्चपासून तापमान वाढू लागते आणि कधीकधी फेब्रुवारीच्या अखेरीसच उन्हाळ्याची चिन्हे दिसू लागतात.
काल सोमवारी जळगावचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस इतके होते. आज (दि ११) आकाश मुख्यतः निरभ्र असणार आहे. दुपारी पश्चिमेकडून १४ ते सायंकाळी उत्तर पश्चिमेकडून ८ किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यादरम्यान पारा २ ते ३ अंशांनी वाढणार असून कमाल तापमान ३७ अंशावर जाण्याची शक्यता आहे. सध्या दुपारवेळीस उकाडा वाढल्यामुळे आणि उन्हाच्या झळा लागत असल्यामुळे जळगावकर हैराण झाले. आता रात्रीच्या तापमानातही हळूहळू वाढ होताना दिसत असून यामुळे पंखे कुलर लावण्याची गरज नागरिकांना पडू लागली आहे.
दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत असून त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडणे टाळण्याची गरज आहे. फेब्रुवारीच्या पंधरवड्यात उन्हाच्या झळा बसत असून मार्च महिन्यात काय होईल? याची चिंता जळगावकरांना सतावत आहे.