---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

अवकाळीच्या सावटामुळे जळगावचा पारा चाळीशीच्या खाली ; उष्णतेतून जळगावकरांना दिलासा

tapman
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२५ । मागच्या काही दिवसापासून जळगावमध्ये उन्हाची दाहकता वाढली होती. वाढत्या उष्णतेने जळगावकर होरपळून निघाला. मात्र मागच्या ३ दिवसात तापमानाचा पारा घसरला. अवकाळी पावसाच्या सावटामुळे ढगाळ वातावरण तयार झाल्याने जळगावचे कमाल तापमान चाळीशीच्या खाली आला. यामुळे उष्णतेतून जळगावकरांना दिलासा मिळाला.

tapman

जळगाव जिल्ह्यात मार्च आणि एप्रिलमध्ये सूर्य चांगलाच तापला. एप्रिलमध्येच ‘मे हिट’ जाणवला. सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाचा चटका बसत होता. तर दुपारनंतर तर भाजून काढणारे ऊन पडत होते. अनेक दिवस तापमान ४३ अंशावर स्थिर होते. त्यात काही दिवस उष्णतेची लाट होती. यामुळे जळगावकर या उष्णतेच्या लाटेत होरपळून निघाला होता.

---Advertisement---

मात्र मागच्या दोन तीन दिवसापासून अवकाळी सावटामुळे तापमानात घसरण झाली. मंगळवारी जळगावचे तापमान ३७.५ अंश तर किमान तापमान २५ अंशापर्यंत होते. दरम्यान काल मंगळवारी जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने जळगावकरांना उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळाला.

 

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment