जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२५ । जळगावमध्ये गेल्या दिवसापासून उन्हाचा पारा ३५ अंशावर जात असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. यातच फेब्रुवारी अखेरीस तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आज जळगावचे तापमान ३७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. आज २७ आणि उद्या २८ फेब्रुवारी रोजी तापमान वाढणार असून, कमाल तापमान ३७.५ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसेच ३ मार्चनंतर उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

खरंतर जळगावसह राज्यात सध्या पहाटे गारवा आणि दुपारी तीव्र उष्णतेचा अनुभव येत आहे. जळगाव मध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ होताना दिसून आले. फेब्रुवारी महिन्यातच जळगावमधील तापमान ३५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असून, प्रखर उन्हामुळे जळगावकर नागरिक हैराण झाले आहेत. रात्री आणि पहाटच्या वेळेस काहीसा गारवा जाणवतो. परंतु सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत आहे. दुपारनंतर तर अंगाची लाही लाही होत आहे. बुधवारी जळगावचे कमाल तापमान ३५.२ तर किमान तापमान १६ अंशावर पोहोचले. दरम्यान मार्चच्या पहिल्या आठवड्यातील तीन दिवस किंचित ढगाळ वातावरण राहणार आहे. ३ मार्चनंतर उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
आज दिवसभर असं राहणार तापमान?
सकाळी ११ वा. – ३० अंश सेल्सियस
दुपारी १२ वा.- ३२ अंश सेल्सियस
दुपारी १ वा.- ३४ अंश सेल्सियस
दुपारी २ वा.- – ३६ अंश सेल्सियस
दुपारी 3 वा.- ३७ अंश सेल्सियस
दुपारी ४- ३७. ५ अंश सेल्सियस
तापमान कमी राहण्याऐवजी वाढ?
सध्या हिवाळ्यात उत्तर भारतातून आणि हिमालयातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे तापमान कमी राहण्याऐवजी वाढ होत आहे. तसेच अरबी समुद्रातील अँटिसायक्लोनिक सिस्टिममुळे वाऱ्यांची दिशा बदलली आहे. पूर्वेकडून थंड वारे ऐवजी उत्तर-पश्चिमी किंवा वायव्य वारे वाहू लागले आहेत, ज्यामुळे दिवसभर सूर्याच्या थेट किरणांचा प्रभाव वाढून तापमानात वाढ होते. ढगांची कमतरता व निरभ्र आकाशामुळे जमिनीवर अधिक सूर्यप्रकाश पोहोचतो आहे. त्यामुळे उष्णता वेगाने वाढत होत असल्याचं हवामान अभ्यासकांनी म्हटलं आहे.