⁠ 
रविवार, मे 19, 2024

जळगाव राज्यात सर्वात गार ; आगामी पाच दिवस असा आहे तापमानाचा अंदाज?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२३ । मागील काही दिवसापूर्वी ऑक्टोबर हिटमुळे जळगावकर चांगलेच हैराण झाले होते मात्र मागील काही दिवसापासून वातावरणात बदल झाला. हिमालयाच्या कुशीत असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरु झालेल्या बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रात उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले झाल्यामुळे गेल्या तीन दिवसात जळगाव जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली असून, सोमवारी जळगाव शहरातील किमान तापमान राज्यात सर्वात कमी १५ अंशापर्यंत खाली आले होते.

राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचे रात्रीचे तापमान १७ अंशावर होते. त्यापेक्षा २ अंशांनी जळगाव शहराचे तापमान कमी म्हणजेच १५ अंशावर होते. एकीकडे रात्रीच्या तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांपासून घट होत असताना, दुसरीकडे दिवसाच्या तापमानात मात्र फारशी घट झालेली दिसून येत नाही. दिवसाचे तापमान ३५ अंशावर असल्याने दिवसा उकाडा जाणवतोय. आगामी दिवसांत तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

आगामी पाच दिवसांचा तापमानाचा अंदाज

२४ ऑक्टोबर
दिवसाचे तापमान- ३५ अंश
रात्रीचे तापमान- १६ अंश
हवामानाची स्थिती – कोरडे हवामान

२५ ऑक्टोबर
दिवसाचे तापमान- ३५ अंश
रात्रीचे तापमान- १६ अंश
हवामानाची स्थिती -वातावरणात धुक्याचे प्रमाण वाढणार

२६ ऑक्टोबर
दिवसाचे तापमान- ३६ अंश
रात्रीचे तापमान – १६ अंश
हवामानाची स्थिती -वातावरणात धुक्याचे प्रमाण वाढणार

२७ ऑक्टोबर
दिवसाचे तापमान- ३५ अंश
रात्रीचे तापमान – १५ अंश
हवामानाची स्थिती -कोरडे हवामान

२८ ऑक्टोबर
दिवसाचे तापमान-३५ अंश
रात्रीचे तापमान -१५ अंश
हवामानाची स्थिती – कोरडे हवामान