जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात तापमान ४२ अंशावर कायम आहे. मंगळवारी जिल्ह्यात ४२.४ अंश इतके तापमान होते. दरम्यान, आज बुधवारी सकाळपासून ऊन सावलीचा खेळ चालू आहे. ढगाळ वातावरण असूनही उकाडा जाणवत आहे. आज तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज उत्तर महाराष्ट्रात पूर्वमाेसमी पावसाच्या सरी काेसळणार असल्याने पुढील आठवड्यात पारा चाळिशीच्या खाली उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशात मान्सूनने वेळेआधीच वर्दी दिली खरी परंतु मागील गेल्या ८ दिवसांपासून कर्नाटकच्या कारवार परिसरात अडकला आहे. मान्सून खोळंबल्याने महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा वाढला आहे. ऐन पावसाच्या तोंडावर उकाडा वाढल्याने अंगाची काहिली होत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा वाढलेले दिसून आला. गेल्या १० दिवसापूर्वी ४० वर आलेला पारा पुन्हा ४२ अंशावर गेला आहे. त्यामुळे दुपारनंतर उकाडा प्रचंड जाणवत आहे. साेमवारी जिल्ह्यात ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद करण्यात आली. दरम्यान, आज ८ जूनपासून उष्णतेची तीव्रता कमी होणार असून तापमान चाळिशीच्या खाली उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर महाराष्ट्रात पूर्वमाेसमी पावसाच्या सरी काेसळणार असल्याने पुढील आठवड्यात पारा चाळिशीच्या खाली उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
११ वाजेला –३६ अंश
१२ वाजेला – ३८अंश
१ वाजेला- ३९ अंशापुढे
२ वाजेला – ३९ अंश
३ वाजेला – ४०अंशापुढे
४ वाजेला – ४० अंश
५ वाजेला – ३९ अंश
६ वाजेला – ३८ अंश
७ वाजेला – ३६ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३५ तर रात्री ९ वाजेला ३४ अंशावर स्थिरावणार.