---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

उन्हाळ्यात गारवा वाढल्याने जळगावकरांना दिलासा ; तापमान घसरणीमागील कारण काय?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२४ । देशासह राज्यातील तापमानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळाला. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून उन्हाच्या झळा सोसल्यानंतर जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहू आणि ढगाळ वातावरणाने जळगाव शहरातील कमाल तापमानात घट झाली. मागील गेल्या दोन दिवसापासून जळगावातील तापमान ३१ अंशंखाली नोंदविले गेले. यामुळे रात्रीच्या आणि पहाटच्या वेळेस थंडी जाणवतेय.

tapman 3

जळगावात गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर तापमानात वाढ होऊन पारा ३७ अंशांपर्यंत गेला. मात्र, रविवारी पुन्हा वातावरणात मोठा बदल होऊन, अचानक गारवा वाढला व तापमानात घट होऊन मार्च महिन्यात रात्रीचा पारा १३ अंशापर्यंत खाली घसरला. हिमालयात सुरु असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम जळगावच्या वातावरणावर होताना दिसत आहे.

---Advertisement---

शनिवारी (२ मार्च) जळगावचे तापमान ३७ अंशाहून जास्त होते. मात्र रविवारी यात मोठी घट होऊन ते ३१ अंशाखाली आले. सलग दुसऱ्या दिवशी जळगावचे तापमान ३१ अंशाखाली नोंदविले गेले. सोमवारी जळगावचे तापमान ३०.९ अंश नोंदविले गेले. दरम्यान, तापमानात घसरण झाल्याने जळगावात उन्हाळ्यात गारवा वाढला आहे. यंदा हिवाळ्यातील नोव्हेंबर ते फेब्रुवारी चार महिन्यात जिल्ह्यात फारसा गारठा जाणवला नाही. मात्र, आता मार्च महिन्यात ऋतुमान बदलण्याचा काळ सुरु असताना, नेहमी मार्च महिन्यात तापमानात वाढ होऊन उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होत असते. मात्र रविवारी रात्री अचानक तापमानात बदल होऊन वाढ न होता, घट होऊन गारठा वाढला होता.

दि. २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान पारा ३५ अंशाच्या पुढे गेल्यामुळे तप्त उन्हाच्या झळा जळगावकरांना बसल्या. मात्र आता जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. सध्याच्या गारवामुळे कपाटात ठेवलेले उबदार कपडे पुन्हा काढण्याची वेळ जळगावकरांवर आली

तापमान घट मागील कारण काय?
उत्तरेकडून वारे वाहत आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरु झाली आहे. यामुळे वेस्टर्न डिस्ट्रबन्स पुन्हा सक्रीय झाला आहे. यामुळे उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे येत असल्याने तापमानात घट झाल्याची माहिती हवामान तज्ज्ञ यांनी दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---