⁠ 
सोमवार, मे 27, 2024

जळगावकरांनो काळजी घ्या! हवामान खात्याकडून जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव न्यूज | 14 एप्रिल 2024 | सध्या जळगावसह राज्यातील अनेक भागात सूर्य नारायणाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. तापमान 43 अंशापर्यंत गेल्याने उन्हाच्या प्रचंड झळा बसत असून उकाडा वाढला आहे. रात्री 11 वाजेपर्यंत उष्ण झळा कायम असतात. यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. यातच हवामान खात्याने जळगावसह 7 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर आजही काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
हवामान विभागाने पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे, कोकणात आज पावसाची शक्यता आहे.

या भागात पावसाची शक्यता..
आज दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ठाणे आणि मुंबईत कोरडं वातावरण पाहायला मिळेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात अनेक भागात अवकाळी पावसानं झोडपून काढलं आहे. यामुळे शेतीसह फळबागांचंही नुकसान झालं आहे. परभणीतील पुर्णा तालुक्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस त्यामुळे काढणीला आलेल्या ज्वारीचं नुकसान झालं आहे.