जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२३ । जळगावरकांना मे हीटचा चांगलाच तडाखा बसताना दिसत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळीने हजेरी लावल्याने तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत राहिल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर तापमानाचा पारा वाढला असून यामुळे जळगावकरांना चांगलाच घाम फुटला आहे.
जळगावात गेल्या आढवड्यापासून उष्णतेने कहर होत असल्याचे चित्र आहे. जळगाव शहरात काल 18 मे रोजी कमाल तापमान 42 अंशांपेक्षा जास्त होते तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस पर्यंत होते. आज 19 मे रोजी कमाल तापमान 42.7 अंशांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
सध्याच्या वाढत्या तापमानामुळे शहरातील वर्दळ मंदावली असून दुपारी बाजारपेठेत अघोषित संचारबंदी असल्यासारखी स्थिती असते. सकाळी 9 वाजल्यापासूनच अंगाला उन्हाचा चटका लागत आहे. दुपारनंतर तर सूर्यनारायण आग ओकत आहे. यामुळे दुपारीनंतर तर बाहेत पडणे कठीण झालं आहे.
यापूर्वी 11 व 12 मे रोजी जळगाव जिल्ह्याचे तापमान देशात सर्वाधिक होते. यंदा एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने तडाखा दिल्यानंतर मे महिन्याची सुरूवात देखील अवकाळी पावसाने झाल्याने वाढलेले तापमान चाळिशीच्या आत आले. मात्र, ६ मे पासून तापमानात वाढ झाली. 36 ते 37 अंशांवर असलेल्या तापमानाने 7 मे रोजी चाळिशी ओलांडली. तेव्हापासून काल म्हणजेच 18 मे पर्यंत तापमान एकदाही चाळीस अंशांच्या खाली आले नाही. उलट दिवसेंदिवस मे हिटचे चटके वाढतच