वाळू माफियांकडून तलाठ्यास टॉमीने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न ; जळगावातील धक्कादायक घटना

डिसेंबर 2, 2025 9:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अवैध वाळू माफियांकडून होणाऱ्या हल्ल्याच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीय. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाचे वाळू माफियांवर नियंत्रण नसल्याने वाळू तस्कर मुजोर झाले आहे.

valu 1

अशातच जळगावच्या पिंप्राळा शिवारात अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तलाठी राजू कडू बाहे (वय ५३) यांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली. तसेच शिवीगाळ करीत टॉमीने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वाळूमाफिया मनोज रमेश भालेराव, फैजल खान आणि चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

पिंप्राळ्याचे तलाठी राजू बाहे हे खंडेराव नगराकडून तलाठी कार्यालयाकडे जात होते. त्यांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे परवान्याबाबत विचारणा केली. या वेळी ट्रॅक्टरच्या मागून दुचाकीवरून यापूर्वी वाळू वाहतुकीची कारवाई केलेला मनोज भालेराव हा त्याचा मित्र फैजल याच्यासोबत तेथे आला. त्याने बाहे यांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांना ढकलून दिले.

Advertisements

फैजल याने बाहे यांच्यावर टॉमीने हल्ला केला; परंतु बाहे हे बाजूला सरकल्यामुळे चालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. याप्रकरणी तलाठी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून संशयित मनोज सुरेश भालेराव, फैजल खान व ट्रॅक्टरचालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात बेसुमारपणे वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे. याबाबत महसूल व पोलिस प्रशासन ठोस पाऊल उचलत नसल्याने वाळू तस्कराकडून बिनधास्तपणे नदी पात्रातून वाळू चोरी सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now