---Advertisement---
जळगाव जिल्हा

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचे जळगाव ग्रामीण तालुक्यात जल्लोषात स्वागत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२३ । काँग्रेसचे (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जनसंवाद यात्रा काढण्यात आली जळगाव जिल्ह्यात तीन सप्टेंबर पासून जनसंवाद यात्रेची अंमळनेर तालुक्यापासून सुरुवात झाली.

congress jansavad jpg webp webp

8 सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर भुसावळ मार्गे नशिबात येथे जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी तर्फे जनसंवाद यात्रेचे फटाक्यांची आतिष बाजी करून ढोल ताशांच्या गजरात जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांनी स्वागत केले यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी जनतेच्या मनातील समस्या व प्रश्न जाणून घेतले व जनसंवाद यात्रेचे महत्व उपदेश समजून सांगितले.

---Advertisement---

या माध्यमातून जनतेतून एकच आवाज असा आहे की देशाला काँग्रेसची गरज आहे सत्ताधारी पक्षाने जनतेला महागाईच्या दारात ढकलले आता देशाला व राज्याला फक्त काँग्रेसच न्याय देऊ शकते हे सिद्ध झाले आहे यावेळी नशिराबाद शहराध्यक्ष अजित मोमीन, ज्ञानेश्वर कोळी, हमीद शेख, सुभाष भंगाळे,मुस्ताक मोमीन, रमजान मोमीन,रशीद मोमीन,कासम मोमीन, गफ्फार मोमीन, जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---