---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या हवामान

जळगावसह राज्यातील अनेक ठिकाण मुसळधार पाऊस ; आज काय आहे पावसाची स्थिती?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२४ । गेल्या अनेक दिवसापासून जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी तापमान वाढीचा कहर पाहायला मिळाला. वाढत्या तापमानाने नागरिक होरपळून निघाले होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, अचानक आलेला हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मॉन्सून असल्याचा हवामान खात्याचा दावा आहे.

5june rain jpg webp

दरम्यान, आजही राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आजपासून मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसासाठी यलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा तडाखा, ढगाळ हवामान आणि उकाडा कायम राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

---Advertisement---

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जळगावात पावसाची हजेरी
निकालाच्या दिवशी जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी सायंकाळी तासभर जोरदार पाऊस झाल्यामुळे जळगावकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती. जोरदार पावसाने शहरातील अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते. दरम्यान गेली दोन दिवस दिवसभर उन्हाचा चटका बसत असून सायंकाळी पाऊस पडत असल्याचं साध्याच चित्र आहे. आज दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवेल. सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---