जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुने २०२५ । मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी अद्यापही काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली नाहीय. जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान आता आजपासून आगामी चार दिवस जळगावात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी पाऊस झाला. आता २२ ते २५ जून दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. २२ जून रोजी काही ठिकाणी दुपारी दोन ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान पावसाची शक्यता आहे.

तर इतर काही ठिकाणी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेदरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. या काळात जळगावात ५० ते १०० मिमी पाऊस अपेक्षित आहे. वारे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहतील, असा अंदाज हवामान अभ्यासक यांनी वर्तवला.






