जळगाव रेल्वे दुर्घटना; ‘या’ सहा रेल्वे स्थानकांवर हेल्पलाइन क्रमांक जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२५ । जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) नजीक परधाडे रेल्वे स्थानकाजवळ एक भयंकर रेल्वे दुर्घटना (Railway Accident) काल बुधवारी घडली. ज्यामध्ये आग लागल्याच्या अफवेने प्रवाशांनी पुष्पक एक्स्प्रेसमधून (Pushpak Express) उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने (Karnataka Express) अनेकांना चिरडले. ज्यात १३ प्रवाशांना मृत्यू झाला. तर या घटनेने जवळपास २० प्रवाशी जखमी झाले आहे. दरम्यान या घटनेने जळगावच नव्हे तर अख्या देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विभागातील सहा रेल्वे स्थानकांवर चौकशी कक्ष सुरू करण्यात आले. Jalgaon Railway Accident
अपघातातील मृतांची नावे
१. कमला नवीन भंडारी (वय ४३, रा. कुलाबा, मुंबई), २. लच्छीराम रवयू पासी (वय ४०, नेपाळ), ३. इम्तियाज अली (वय ३५, रा. उत्तर प्रदेश), ४. नसुरुद्दीन बहुद्रदीन सिद्दीकी (वय १९, रा. उत्तर प्रदेश), ५ जवकला भटे जयकडी (वय ८०, नेपाळ) ६. हिनु नंदराम विश्वकर्मा (वय ११, रा. नेपाळ) ७. बाबु खान (वय २७, रा. उत्तर प्रदेश), ८. अनोळखी महिला, उर्वरित मयत हे पुरुष असून त्यांची ओळख पटलेली नाही.
असे आहेत जखमी
१. कमला विक्रम विश्वकर्मा, नेपाळ, २. रेकेश दाणे जयगडी (वय १३, नेपाळ), ३. सुशिल विक्रम विश्वकर्मा (वय ८, नेपाळ), ४, करिश्मा विक्रम विश्वकर्मा (वय ५, नेपाळ) ५. मोहन जयगडी (वय १९, ६. रंगीला झटकऊ पासी (वय ३२, नेपाळ), ७. शब्बीर, चांदअली तेली (वय ३५, नेपाळ), ८. शोकत अली तेली (वय ४५, नेपाळ), ९. नुर मोहम्मद तेली (वय ३०, नेपाळ), १०, जुमरत अली सिद्दीकी (वय २५, गोंडा, उत्तर प्रदेश), ११. रहेमन अली सिद्दीकी (वय १८, गोंडा, उत्तर प्रदेश), १२. मोहम्मद असमीर सिद्दीकी (वय ३५, गोंडा, उत्तर प्रदेश), १३, रिजवान सिद्दीकी (वय १८, गोंडा, उत्तर प्रदेश).
सहा ठिकाणी सुरू केले चौकशी कक्ष
अपघातामुळे विभागातील सहा रेल्वे स्थानकांवर चौकशी कक्ष सुरू करण्यात आले. यात भुसावळ येथे ८७९९९८२७१२, जळगाव ८७९९९५२५१९, मनमाड स्थानकावर ७४२००५८५५६, ब-हाणपूर स्टेशन ८२६३९१६३१४, खंडवा स्टेशन ८२६३९१६२९६ आणि नाशिक रोड स्थानकावर ८६००३११८५० असे हेल्पलाइन क्रमांक रेल्वेने जाहीर केले.