जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. जळगाव पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार या पदांसाठी एकूण 137 रिक्त जागा भरल्या जातील. Jalgaon Police Bharti 2024
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ५ मार्च २०२४ पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. Jalgaon Police Recruitment 2024
पदाचे नाव – पोलीस शिपाई, चालक
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे [मागासवर्गीय- 33 वर्षे, अपंग- 45 वर्षे ]
परीक्षा फी : 450/- रुपये [मागास प्रवर्ग:- 350/- रुपये]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२४
भरती जाहिरात (Notification PDF): येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल, त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.