जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२४ । जळगाव शहरातील पिंप्राळामध्ये आषाढी एकादशीनिमित्त रथ उत्सव हा साजरा केला जातो. या रथोत्सवाची गेले 148 वर्षाची परंपरा असून यावर्षीही ही परंपरा कायम राहिली आहे. मात्र, याच दरम्यान, एक मोठी घटना घडली
रथ उत्सवात रस्त्याच्या उतारावरून रथाचा वेग हा भाविकांच्या आटोक्यात न आल्यामुळे रथाचे चाक हे गटारी मध्ये गेल्याने इमारतीवर जाऊन आढळला. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी नाही. गटारीमध्ये अडकलेल्या रथाची चाकं काढण्यासाठी भाविक भक्त अतोनात प्रयत्न करताना दिसून आले.
आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पिंप्राळ्यातील रथोत्सव पाहण्यासाठी शहरासह आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या संख्यने भाविक येत असतात. रथाचे चाक हे गटारीमध्ये गेल्याने ते काढण्यासाठी अनेकांनी प्रयन्त केले. मात्र शेवटची जेसीबीच्या सहाय्याने रथाचे चाके गटारीतून बाहेर काढण्यात येत आहे. पोलीस प्रशासनातर्फे देखील या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.