जळगाव शहर
जुने बीजे मार्केटमधील २४ व्यापाऱ्यांनी भरली ‘इतक्या’ लाखांची थकबाकी
जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । जळगाव महापालिकेच्या मालकीच्या मार्केटच्या गाळ्यांच्या थकबाकीची वसुलीची माेहिम तीव्र केली आहे. साेमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी जुने बीजे मार्केटमधील २४ व्यापाऱ्यानी सुमारे ५० लाख रुपयांची थकबाकी भरली.
शहरातील जुने बी. जे. मार्केट येथील व्यापाऱ्यांनी शनिवारपर्यंत मुदत मागितली होती. मंगळवारी उपायुक्त संतोष वाहुळे व प्रशांत पाटील यांचे पथक जुने बी. जे. मार्केट, वालेचा मार्केट, गांधी मार्केट आणि भोईटे मार्केट याठिकाणी जाणार आहे. वारंवार रक्कम भरण्याचे सांगूनही ती रक्कम न भरणाऱ्या व्यापाऱ्यांचे गाळे सीलची कारवाई याठिकाणी केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने कळवले आहे.