---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावकरांना ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा ; दिवसा बसतात चटके, तर रात्री गुलाबी थंडीची चाहूल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२३ । देशासह महाराष्ट्रात पाऊस हळूहळू कमी होत चालला असून येत्या काही दिवसांत देशातून मान्सून पूर्णपणे माघारा घेईल. पाऊस माघारी फिरताच राज्यातील जनतेला ‘ऑक्टोबर हीट’ची चाहूल लागली आहे. रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी हे शहर आॅक्टोबरमधील सर्वाधिक ’हीट’ शहर ठरले. या शहराचे कमाल तापमान ३७.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले.विदर्भात कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले.

tapman jpg webp webp

जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाचा तापमानाचा पारा वाढवल्याने दिवसा उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. ऑक्टोबरमधील वाढत्या उष्म्याने जळगावकरांना चांगलाच घाम फोडला आहे. मात्र, रात्री तापमानात घट होत असून, रात्रीच्या वेळेस नागरिकांना गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे.

---Advertisement---

जळगावमधून मान्सून आता जवळ-जवळ परतला असल्याने वातावरणात ऋतुमान बदलाचे संकेत दिसू लागले आहेत. पावसाळा संपल्याने हळूहळू तापमानात बदल जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाचा पारा ३६ ते ३७ अंशावर गेल्याने घामाच्या धारा लागत असल्याने जळगावकर हैराण झाले आहे. सध्या वातावरणात उष्मा असल्याने आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. जळगावकरांना आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविली आहे.

दरम्यान, दिवसाचे तापमान जास्त असले तरी रात्रीच्या तापमानात चांगलीच घट होत असून, १ ते २ ऑक्टोबरदरम्यान रात्रीचे २३ ते २४ अंश असलेले तापमान रविवारी १८ अंशावर आला होता. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पहाटे चार ते सात वाजेदरम्यान चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. दरम्यान, आगामी आठवडाभरात रात्रीच्या तापमानात आणखीन घट होऊन, पारा १६ ते १८ अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर २० ऑक्टोबरनंतर रात्रीचे तापमान १४ ते १६ पर्यंत घसरण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---