जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । जळगाव येथून जवळच असलेल्या कुसुंबा येथे दाम्पत्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता. जळगाव पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन दिवस रात्रंदिवस परिश्रम घेत गुन्ह्याचा छडा लावला आहे. मयत आशाबाई यांच्याकडून व्याजाने घेतलेले पैसे परत न देण्यासाठीच खून करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, एमआयडीसीचे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी गुन्हयांतील आरोपी निष्पन्न करण्यासाठी समातंर तपास करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे ७ ते ८ वेगवेगळे पथके तयार करुन प्रत्येक पथकाला वेगवेगळे कामे सोपविण्यात आलेली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथके घटनास्थळाचा परिसरात गोपनिय माहिती परिसरांतील सीसीटीव्ही फुटेज, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, तांत्रिक माहिती गोळा करून त्यांचे बारकाईने अवलोकन करण्यात आले होते. मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पथकाने संशयीत आरोपीतांची सखोल माहिती घेतली. मयतांची पार्श्वभूमी गोपनिय माहिती घेतली. संशयीत आरोपीतांचा गुन्हयांचा उद्देश काय होता याबाबत माहिती घेतली. सर्व माहिती मिळाल्यानंतर संशयीत आरोपींची माहिती त्यांचा व्यवसाय, त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचे मयताशी असलेले संबंध या सारासार गोष्टींचा विचार करुन अनेकांची दोन दिवस झाडाझडती घेतली.
तिघांवर बळकावला संशय
पथकाने केलेल्या चौकशीत काही नावे समोर आल्याने देविदास नामदेव श्रीनाथ वय-४० गुरुदत्त कॉलनी, कुसूबा, अरुणाबाई गजानन वारंगणे वय-३० रा.कुसुंबा व सुधाकर रामलाल पाटील वय-४५ रा.चिंचखेडा ता.जामनेर यास चिंचखेडा येथील राहते घरी वेगवेगळे पथके पाठवून त्यांना एकाच वेळी चौकशी कामी ताब्यात घेतले. त्यांना गुन्हयांबाबत सखोल विचारपुस करीत असतांना त्यांनी गुन्हयांची कबुली दिली.
एकीने घेतले होते पैसे, दोघांना होती गरज
पथकाने केलेल्या चौकशीत तिघांनी गुन्हा कबूल केला आहे. संशयीत अरुणाबाई हीने मयत आशाबाई हिचेकडून व्याजाने पैसे घेतले होते. सुधाकर पाटील हा सुध्दा आर्थिक अडचणीत होता. मयतहिचे कडेस मोठया प्रमाणात रोख रक्कम व सोन्याचे दागिने असून मयत हिला मारण्याचा व तिचे कडील रोखं रक्कम सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रथम कट रचला.
पतीचा गच्चीवर तर तर पत्नीचा घरातच आवळला गळा
सुधाकर पाटील यांनी गळफास देण्यासाठी दोरी व कटर घेऊन ते देविदास व अरुणाबाई यांचेकडेस देवून तो प्रथम मयताचे घरी गेले. त्यानंतर थोडयावेळाने सुधाकर पाटील हा मयताचे घरी गेला. त्यानंतर देविदास व सुधाकर पाटील अशांनी प्रथम मयत मुरलीधर पाटील यास त्यांचे घराचे गच्चीवर गळफास देवून मारुन टाकले. तेव्हा अरुणाबाई हिने मयत आशाबाई पाटीलला घरात गप्पा गोष्टीत व्यस्त ठेवले. देविदास गच्चीवरुन आल्यावर मयत आशाबाई मुरलीधर पाटील ही खुर्ची बसलेली होती. अरुणाबाई तिच्याजवळ खाली बसलेली होती. देविदासने मागून येत तिच्या गळयाला दोरीने गळफास दिला. यावेळी सुधाकर पाटील याने मयताचे पाय धरुन ठेवले होते व अरुणाबाई वारंगणे हिने उशीने तोंड दाबून तिला सुध्दा जिवे ठार मारले. त्यांना मारल्यानंतर तिघे आरोपीतांनी मयताचे अंगावरील सोन्याचे दागिने व तिचे घरातील रोख रुपये चोरी केले. त्यानंतर सुधाकर पाटील हा त्याचे मोटार सायकलवर, देविदास श्रीनाथ व अरुणाबाई वारंगणे दोघे देविदास याचे मोटार सायकलवर बसुन चिंचखेडा येथे निघून गेले होते.