महावीर जयंतीला चिकन, मटण विकणाऱ्या ९ जणांवर कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । शहरासह जिल्ह्यात महावीर जयंतीनिमित्त मांस विक्री करण्यास मनाई करण्यात आली होती. जळगाव शहरातील दंगलग्रस्त कॉलनीत मांस विक्री करणाऱ्या ९ जणांवर मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

या दुकानांवर केली कारवाई

अपना चिकन दुकान, एवन चिकन दुकान, अमोल  चिकन दुकान, भवानी  चिकन दुकान, हसनियन  चिकन दुकान, अलिशान  चिकन दुकान, सातपुडा  चिकन दुकान, मटन दुकान दंगलग्रस्त कॉलनी, मटन दुकान दंगलग्रस्त कॉलनी अशा नऊ दुकानांवर कारवाई करण्यात आली.