---Advertisement---
राजकारण

राष्ट्रवादीतील फेरबदल निश्चित, नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असता त्यात जिल्हाध्यक्ष पदासाठी गुलाबराव देवकर आणि महानगराध्यक्ष पदासाठी अशोक लाडवंजारी यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती मिळत आहे. 

ashok ladvanjari jpg webp

जळगाव शहर महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी यांची लवकरात लवकर नियुक्ती करावी यासाठी सर्वांनी एकमुखी मागणी केली. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार मनिष जैन, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, पणनचे चेअरमन संजय पवार, विनोद देशमुख, माजी आमदार जगदीश वळवी, माजी आमदार दिलीप सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, इजाज मलिक, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी, जळगाव महिला महानगर जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, प्रवक्ते योगेश देसले, उमेश नेमाडे, अरविंद मानकरी यांचा समावेश होता. 

---Advertisement---

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठ ते दहा दिवसांत ही मागणी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती अशोक लाडवंजारी यांनी दिली. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आजारी असल्याने त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय होईल असेही ते म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---