जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । राज्यातील आरोग्य प्रशासन कोविडशी झुंजत असताना दुसरीकडं रुग्णालयांतील अपघातांच्या घटना घडत आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आगीच्या दुर्घटना बघता आज जळगाव शहरातील सर्व कोविड रुग्णालय यांची तपासणी करण्यात आली.
यावेळी प्राथमिक स्वरूपाच्या आग नियंत्रणाची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखवितांना अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी सहा.अग्निशमन अधिकारी सुनिल मोरे फायरमन अश्वजित घरडे, तेजस जोशी , नितीन बारी यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कोविड रुग्णालयांना लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील सर्व कोविड रुग्णालयात आगीच्या घटना घडू नये म्हणून मनपा अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणाची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आली. शहराती विविध कोविड रुग्णालयात जाऊन त्यांनी आगीबाबचा डेमो करून दाखवला.