जळगाव महापालिकेची अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई, साहित्य जप्त

फेब्रुवारी 17, 2026 3:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेने जोरदार कारवाई केली. शहरातील नवी पेठ परिसरासह टॉवर चौक परिसरातील जैन मंदिरासमोरील अतिक्रमण हटवून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

atikraman

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळपासूनच नवी पेठ परिसरात कारवाईला सुरुवात केली. विशेषतः टॉवर चौक परिसरात रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक जागेत अनधिकृतपणे ठेवण्यात आलेल्या लोखंडी पेट्या, हातगाड्या आणि इतर साहित्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाने कठोर पावले उचलत जैन मंदिरासमोरील परिसरातील अतिक्रमण हटवले.

Advertisements

लोखंडी पेट्या आणि हातगाड्या जप्त

या कारवाईदरम्यान एकूण २० लोखंडी पेट्या आणि ६ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेले साहित्य महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांवर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. अतिक्रमण हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आणि नागरिकांना दिलासा मिळाला.

Advertisements

महानगरपालिकेने शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहिमेची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातही सार्वजनिक रस्ते, चौक आणि फूटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नियमित कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now